अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा वाचनालयातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर - जिल्हा वाचनालयाच्या वतीने माजी राज्यमंत्री स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली.

स्व. अनिल राठोड यांची जयंती दि.12 मार्च रोजी आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निबंध स्पर्धेचे आयोजन वाचनालयाने केले आहे. निबंध स्पर्धेकरीता असलेल्या शालेय गटासाठी (इ. 8 वी ते 10 वी) 1) निर्भिड नेतृत्व अनिलभैय्या राठोड. 2) मला भावलेले भैय्या. 3) कार्यकर्त्यांच्या भुमिकेत अनिलभैय्या हे विषय आहे.

शालेय गटासाठी 500 शब्दांची मर्यादा आहे. खुल्या गटासाठी 1) लोकाभिमुख नेतृत्व अनिलभैय्या राठोड. 2) कार्यकर्ता ते मंत्री असा भैय्यांचा प्रवास 3) नगरकरांच्या हृदयातील भैय्या. खुल्या गटासाठी 1 हजार 500 शब्दांची मर्यादा आहे.

स्पर्धकांनी आपले निबंध दि. 25 मार्च 2021 पर्यंत अहमदनगर जिल्हा वाचनालय, नेता सुभाष चौक, चितळेरोड, अहमदनगर या पत्त्यावर पाठवावेत. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.

अधिक माहितीसाठी वाचनालयाच्या 0241 - 2345882 या क्रमांकावर तसेच उपाध्यक्षा शिल्पा रसाळ (9860067575) यांच्याशी ग्रंथपाल अमोल इथापे (मो.9595666770) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष अजित रेखी, खजिनदार तन्वीर खास व सहकार्यवाह डॉ. राजा ठाकूर यांनी केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !