मुंबई : राज्यात करोना पर्साज पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. त्यापार्शवभूमीवर ‘अन्न व औषध प्रशासना’ने करोनावर गुणकारी ठरणाऱ्या ‘रेमडेसिवीर’च्या किमती कमी केल्या आहेत. ४५०० ते ५४०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता १२०० ते १८०० रुपयांना राज्यात सर्वत्र उपलब्ध होत आहे.
मुंबईतील रुग्णालये अजूनही ‘एफडीए’च्या ‘विनंती’बाबत आडमुठे धोरण अवलंबत असली तरी लवकरच तेही रुग्णहिताचा विचार करून किमती कमी करतील, असा विश्वास ‘एफडीए’चे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला.
राज्यात १ कोटी ७७ हजार ५६० रूग्णांवर उपचार सुरू
राज्यात कोरोनाचा कहर आणि धोका वाढत असताना, लोकांना मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. लोक लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना खुलेआम फिरताना दिसत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरत आहेत.
गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रूग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली आहे. तर ७० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे २५ हजारांहून अधिक रूग्ण वाढले आहेत.
तर, सध्या राज्यात १ कोटी ७७ हजार ५६० रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांत आजपर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ झाली आहे.
दरम्यान, कोरोनाची रुग्ण संख्येत होणारी वाढ आणि नियमांना दिला जाणारा फाटा, यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक इशारा दिला आहे. वेळप्रसंगणी कडक लॉकडाऊन लावावे लागेल.
कृपया नियमांचे पालन करा. मास्क वापरा, हात साबणाने स्वच्छ धुवा, असे आवाहन त्यांनी केले आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.
राज्यातल्या सर्व खासगी ऑफिसेसमध्ये 50 टक्केच उपस्थिती ठेवावी, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.