अबब ! शुक्रवारी ३०३ नवे कोरोनाबाधित आढळले..

अहमदनगर - जिल्ह्यात शुक्रवारी १८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ५६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सहा वाजले पासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १,३९४ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११८ आणि अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८४, अकोले १९, जामखेड ०६, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०९, राहुरी ०५, संगमनेर ३०, श्रीगोंदा ०४, कॅन्टोन्मेंट बोर्ड १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ०३, कर्जत ०३, कोपर गाव ०७, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०७,  पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता १५, राहुरी ०९, संगमनेर २१, शेवगाव ०१, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ११ जण बाधित आढळुन आले. नगर ग्रामीण ०२ पारनेर ०१, राहाता ०४, संगमनेर ०२, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७१, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर १६, पाथर्डी ०७, राहाता १४, राहुरी ०५, संगमनेर ४८, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२,  श्रीरामपूर ०४ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !