अहमदनगर - कोरोनाचा प्रकोप शनिवारीही कायम होता. बोल्हेगाव परिसरात जास्त रुग्ण सापडल्यामुळे लॉकडाऊनऐवजी कंटेन्मेंट झोनचा पर्याय निवडण्यात आला आहे. नगर शहरात तीन कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. दि. २६ मार्चपर्यंत सर्व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी हा आदेश काढला आहे. शनिवारी एकूण ४५२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात एकूण ५०९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते.
बोल्हेगाव परिसरातील गणेश चौक ते राघवेंद्र स्वामी रस्त्याची पूर्व बाजू आदिकैलास-बी इमारत, राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर्स ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत व बोल्हेगाव मनोलिलानगर येथील डहाळे ज्वेलर्स ते भानुदास लोटके यांचे घर या भागात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.
गेले दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३१ आणि अँटीजेन चाचणीत ४१ रुग्ण बाधीत आढळले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा ते शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत एकूण ४५२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९, अकोले ३, कोपरगाव १४, नगर ग्रामीण ३, नेवासा ४, पारनेर १३, पाथर्डी १, राहाता २९, राहुरी १, संगमनेर २०, शेवगाव ३, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर २८ आणि इतर जिल्हा २, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७९, अकोले ६, जामखेड ४, कर्जत ५, कोपरगाव १७, नगर ग्रामीण ६, नेवासा ८, पारनेर १३, राहाता ३६, राहुरी २, संगमनेर २६, शेवगाव २, श्रीगोंदा १, श्रीरामपूर १८, इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत शुक्रवारी ४१ जण बाधित आढळुन आले. मनपा ५, अकोले १, जामखेड १, नगर ग्रामीण १, पारनेर २, पाथर्डी ९, राहाता ५, राहुरी ९, श्रीगोंदा २ आणि इतर जिल्हा ४, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा ते शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या कालावधीत एकूण ३६२ जणांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.