'तो' परीक्षेत पहिला आला, अन न्यायाधीशांनी दिला 'हा' निर्णय !

नालंदा (बिहार) - एका गुन्ह्यातील आरोपी इंटर सायन्सच्या प्रथम वर्षात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन न्यायालयात दाखल झाला. यानंतर न्याय परिषदचे मुख्य दंडाधिकारी मानवेंद्र मिश्र यांनी मुलाला व त्याच्या आई-वडिलांचे कौन्सिलिंग करीत त्याची खटल्यातून सुटका केली.

सामाजिक आणि तरुणाच्या हिताचे निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध न्यायाधीश मानवेंद मिश्रा यांनी पुन्हा एकदा मानवीय गुणांना प्राथमिकता देत शनिवारी हा निर्णय घेतला आहे.

प्रमाणपत्र दाखवत न्यायाधीशांना, 'सर मी इंटरमध्ये पहिला आलो', असे म्हणणारा आरोपी हा बिहार मधील नालंदा ठाणे क्षेत्रातील एका गावात राहणारा आहे. त्याच्या विरुद्ध 2019 मध्ये आपल्या नातेवाईकांसोबत मिळून मारहाण करणे आणि छेडछाड करण्याचा आरोप होता. आरोपी मुलगा शनिवारी इंटर सायन्सचा रिजल्ट आल्यानंतर प्रमाणपत्रासह कोर्टात हजर झाला. विद्यार्थ्याने इटंर सायन्समध्ये 69 टक्के गुण मिळवले आहेत.

त्याला व्हायचंय इंजिनीअर

मुलाने आणि त्याच्या आई-वडिलांनी सांगितले की, तो भविष्यात इंजिनिअरिंगच शिक्षण घेऊ इच्छितो. त्यासाठी त्याला बिहारमधून बाहेर जायची इच्छा आहे. अशा परिस्थितीत कोर्टात जर खटला सुरू झाला तर त्याना शिक्षण सोडून वारंवार न्यायालयात यावे लागेल. त्यामुळे मुलाने आणि त्याच्या पालकांनी न्यायालयात खटला संपवण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी मुलाची प्रतिभा पाहून खटल्याची पुढील कारवाई बंद केली.

अभ्यासात अडचण येईल म्हणून...

आपला निर्णय सुनावताना न्यायाधीश म्हणाले, खटला सुरू ठेवला तर मुलाच्या अभ्यासात अडचणी उभ्या राहतील. अशात मुलाच्या हितासाठी खटला सुरू ठेवणे योग्य राहणार नाही. मुलाची योग्य देखभाल आणि संरक्षणासाठी कोर्टाने खटल्यातून त्याची सुटका केली आहे. 

तसेच तरुण वयात आपल्या कुटुंबात वाद-भांडणे झाली तर तरुण मुले आई-वडील किंवा कुटुंबाच्या बचावासाठी स्वत: पुढे येतात, असेही निरीक्षण देखील त्यांनी नोंदविले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !