लॉकडाऊन नाहीच ! राज्य सरकारने जारी केल्या 'या' गाईडलाईन्स

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याच्या  पार्शवभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तूर्तास तरी लॉकडाऊन नाहीच, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. 

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने नव्या गाइडलाइन्स लागू केल्या असून सर्व नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या 15 हजारांहून अधिक आढळत असल्याने ठाकरे सरकारने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


अशा आहेत गाईडलाईन्स...

- राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल. 

- या आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायजर लावणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही गाइडलाइन्समध्ये जारी करण्यात आले आहे.

- याशिवाय शॉपिंग मॉल्सनाही हे नियम अनिवार्य राहतील.

- तसेच राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- लग्न समारंभासाठी 50 लोकांना परवानगी असेल तर  अंत्यसंस्कारासाठी  20 पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !