नाशिक अंशतः लॉकडाऊन : काय बंद काय सुरु?

नाशिक : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिक जिल्ह्यात अंशतः लोकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. 

सातत्याने आवाहन करूनदेखील नियमांचे पालन होताना दिसत नाही, तसेच बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. यामध्ये आवश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नाशिकमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचीन क्लाससेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १५ मार्च नंतरच्या विवाह सोहळ्याला बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळे ही सायंकाळी ७ ते सकाळी ७ बंद तर शनिवार-रविवार ही धार्मिक स्थळे संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. 

हॉटेल, बारला ९ पर्यंत परवानगी

हॉटेल बार आणि परमिट रूम यांना ५० टक्क्यांच्या क्षमतेने सुरु करण्यास परवानगी असून त्यांना रात्री ९ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. 

हे बंद, हे सुरु...

-नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगाव सर्व शाळा बंद

-वीकेण्डला सर्व धार्मिक स्थळे बंद

-जीम, मैदाने, स्विमिंग टँक केवळ व्यक्तिगत सरावापुरता. स्पर्धा, गर्दी बंदी.

-हॉटेल, परमिट रुम, बार सर्व सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या क्षमतेने सुरू राहतील

-विवाह सोहळ्यांना १५ मार्चनंतर बंदी.

-सर्व आठवडे बाजार बंद

-जीवनावश्यक वस्तू (मेडिकल, वृत्तपत्र, दूध इ.) वगळून इतर आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू राहतील. त्यानंतर दुकाने बंद होतील.

-नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ आज ६७५ नवे रुग्ण

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !