कोरोनाचा स्फोट | नगर जिल्हा 'रेडझोन'मध्येच, एकाच दिवशी आढळले तब्बल 'इतके' रुग्ण

अहमदनगर - जिल्ह्यात रविवारी कोरोनावर मात केलेल्या ८५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८४ हजार ३६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.९१ टक्के इतके झाले आहे. 


दरम्यान, रविवारी जिल्ह्याच्या रूग्णसंख्येत १,२२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५,२४२ इतकी झाली आहे. राहाता, नगर, संगमनेर तालुके सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे रेड झोन मध्ये गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २५७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५९९ आणि अँटीजेन चाचणीत ३७२ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०२, अकोले ३, कर्जत १३, कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ८, नेवासा १२, पारनेर ४, पाथर्डी १, राहता ३८, राहुरी २, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर २ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२१, अकोले १२, जामखेड २, कर्जत ४, कोपरगाव ५२, नगर ग्रामीण २३, नेवासा १२,  पारनेर १४, पाथर्डी ५, राहाता ७४, राहुरी १८, संगमनेर ६७, शेवगाव ६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ५४, कॅंटोन्मेंट ७ आणि इतर जिल्हा१८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत रविवारी ३७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ३१, अकोले १२, जामखेड ४५, कर्जत ४२, नगर ग्रामीण ६, नेवासा २८, पारनेर १७, पाथर्डी ३३,  राहाता १४, राहुरी ६२, संगमनेर १७, शेवगाव १६, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २३  आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, रविवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २९१, अकोले १४, जामखेड ३७, कर्जत १८,  कोपर गाव ७६, नगर ग्रामीण ३४, नेवासा २७, पारनेर २१, पाथर्डी १९, राहाता १११, राहुरी २६, संगमनेर ८४, शेवगाव १५, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर ५२, कॅन्टोन्मेंट १५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या - ८४,३६१
उपचार सुरू असलेले रूग्ण - ५,२४२
एकूण मृत्यू - १,१९२
एकूण रूग्ण संख्या - ९०,७९५
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !