अहमदनगर - जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल ५०९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या २ हजार १५ आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे स्वतः रस्त्यावर उतरले. बसस्थानक, गर्दीच्या ठिकाणी पाहणी करुन विनामास्क आढळून आलेल्या नागरिकांवर त्यांनी कारवाई केली.
गेले दोन आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १९५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५३ आणि अँटीजेन चाचणीत ६१ रुग्ण बाधीत आढळले आहेत. तर दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७९, अकोले ९, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ८, नेवासा ८, पारनेर ७, पाथर्डी १, राहाता १, राहुरी १, संगमनेर १४, शेवगाव २९, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १ आणि इतर जिल्हा १, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९, अकोले ७, जामखेड ९, कर्जत २, कोपरगाव २३, नगर ग्रामीण १०, नेवासा १०, पारनेर ६, राहाता ५२, राहुरी १०, संगमनेर २९, शेवगाव १२, श्रीगोंदा २, श्रीरामपूर १६, इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत शुक्रवारी ६१ जण बाधित आढळुन आले. मनपा १०, कर्जत २, नगर ग्रामीण १, पारनेर २, पाथर्डी १, राहाता ५, राहुरी २९, शेवगाव १, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ४ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ९५, अकोले ५, जामखेड ३, कर्जत १९, कोपरगाव १६, नगर ग्रामीण ९, नेवासा ६, पारनेर २८, पाथर्डी ३, राहाता ५२, राहुरी ७, संगमनेर ३६, शेवगाव २२, श्रीगोंदा ८, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.