अहमदनगर - शनिवारी जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत ६५४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८७१ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी कोरोनावर मात केलेल्या ७६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८० आणि अँटीजेन चाचणीत १८० रुग्ण बाधीत आढळले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६३, नगर ग्रामीण ६, पारनेर १, पाथर्डी २,राहाता १, राहुरी ३, संगमनेर ४, शेवगाव ३, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट बोर्ड १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४०, अकोले ११, जामखेड ४, कर्जत २, कोपरगाव ५३, नगर ग्रामीण १०, नेवासा २, पारनेर १२, पाथर्डी २, राहाता ३९, राहुरी ४, संगमनेर ४७, शेवगाव ३, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ३८ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १८० जण बाधित आढळुन आले. मनपा २२, अकोले ७, जामखेड १४, कर्जत १, नगर ग्रामीण १७, नेवासा १२, पारनेर २५, पाथर्डी १३, राहाता १०, राहुरी ८, संगमनेर ८, शेवगाव १५, श्रीगोंदा १, श्रीरामपूर ७, कॅन्टोन्मेंट ५ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २५०, अकोले १०, जामखेड २८, कर्जत ०५, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण ३१, नेवासा २५, पारनेर ३६, पाथर्डी ३३, राहाता ९४, राहुरी ११, संगमनेर ७१, शेवगाव १४, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट २ आणि इतर जिल्हा २३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या - ८३,५०४
उपचार सुरू असलेले रूग्ण - ४,८७१
आतापर्यंत मृत्यू - १,१९२
एकूण रूग्ण संख्या - ८९,५६७