अबब ! आता मात्र हद्द झाली.. एकाच दिवसात 'इतके' कोरोनाबाधित ?

अहमदनगर - कोरोनाची दुसऱ्या लाटेने नगर जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले आहे. बुधवारी तर जिल्ह्याच्या रूग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. बाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीनुसार नगर जिल्हा कोरोनाच्या घशात चालला असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केले जात असलेले प्रशासनाचे उपायही तोकडे पडत चालल्याचे चित्र आहे.

बुधवारी एकाच दिवसात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत तब्बत १,६८० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ७१४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी १ हजार ३३८ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ९९० इतकी झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६७७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१४ आणि अँटीजेन चाचणीत ४८९ रुग्ण बाधीत आढळले. तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.६४ टक्के इतके झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६४, अकोले ४२, जामखेड २९, कर्जत २०, कोपरगाव १, नगर ग्रामीण २५, नेवासा १०, पारनेर ३३, पाथर्डी २, राहता ९३, राहुरी १८, संगमनेर ४७, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ४९, कॅंटोन्मेंट बोर्ड ९, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि  इतर जिल्हा १ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४३, अकोले ८, जामखेड २, कर्जत २, कोपरगाव ७१, नगर ग्रामीण १८, नेवासा ८, पारनेर १४, पाथर्डी ५, राहाता १०३, राहुरी १७, संगमनेर ५५, शेवगाव ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर ४४, कॅंटोन्मेंट ३ आणि इतर जिल्हा ०ल८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४८९ जण बाधित आढळुन आले. मनपा २६, अकोले ११, जामखेड ६, कर्जत ७९, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ३१, नेवासा ३७, पारनेर १३, पाथर्डी ५६, राहाता ३३, राहुरी ५६, संगमनेर ३, शेवगाव ५७ श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, बुधवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४५७, अकोले ७४, जामखेड ३७, कर्जत १५,  कोपरगाव १०१, नगर ग्रामीण ५१, नेवासा २४, पारनेर ४६, पाथर्डी ३०, राहाता १४०, राहुरी २६, संगमनेर १४८, शेवगाव ७१,  श्रीगोंदा १९,  श्रीरामपूर ६९, कॅन्टोन्मेंट १४ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या - ८६,९९०

आतापर्यंत एकूण मृत्यू - १,२१८

एकूण रूग्ण संख्या - ९४,९२२

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !