शेवगावच्या 'या' प्रश्नासाठी पुढाकार घ्या, पक्ष तुमच्या पाठीशी आहे - आ. सुधीर तांबे

शेवगाव : शेवगाव शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. पक्ष आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास डॉ. सुधीर तांबे यांनी दिला.

आमदार तांबे यांनी शासकीय विश्रामगृहावर तालुका काँग्रेसची आढावा बैठक घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके, किशोर कापरे, समीर काझी, ऍड. लक्ष्मन बोरुडे, बबु वडघणे, पांडूरंग नाबदे, अमोल दहिफळे, मनोज काटे, महेश निजवे आदी उपस्थित होते.

आमदार तांबे यांना तालुक्यातील व शहरातील पक्ष संघटन, युवक काँग्रेस व शाखा स्थापनेबाबत माहिती देण्यात येऊन आगामी नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारांची यादी सादर करण्यात आली. आगामी नगरपरिषद निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढवावी. पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा पुनरुच्चार आमदार तांबे यांनी केला.

शेवगावकरांना वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत पुढाकार घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !