'ते' वेळेवर आले म्हणून 'ती' वाचली, नाहीतर...

अहमदनगर - शहरात परिसरात अनेकदा संकटग्रस्त मुले-मुली दिसून येतात. त्यातील काही बालक निराधार, एकटे असतात. काही छळ होतो, अशा संकटात असलेल्या सर्व मुला-मुलींसाठी चाईल्डलाईन ही सेवाभावी संस्था अहोरात्र कार्यरत आहे. 


नुकतेच या संस्थेने थेट हिंगोली जिल्ह्यातून नगरला आलेल्या एका अल्पवयीन मुलीला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. 
चाईल्डलाईन संस्थेला एमआयडीसी पोलीस स्टेशनमधून हेल्पलाइनला फोनवर माहिती मिळाली होती. 

एक बेवारस अवस्थेत अल्पवयीन मुलगी आम्हाला सापडली आहे. तिला तत्काळ काळजी, संरक्षण आणि निवाऱ्याची गरज आहे. तरी आपण मदत करावी. अशी माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब चाईल्डलाईनच्या कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. 

चाईल्डलाईनचे सदस्य प्रविण कदम व राहुल वैराळ यांनी या मुलीचे समुपदेशन करून तिला धीर दिला. तिच्या सोबत काही अनुचित प्रकार घडला आहे का, ती सुरक्षित आहे की नाही याची खात्री केली. 

फौजदार सुखदेव कणसे यांच्या मदतीने मुलीला निवारा देण्यासाठी बाल कल्याण समितीला पत्रव्यवहार करून निवाऱ्यासाठी परवानगी मागितली. या मुलीची वैद्यकीय तपासणी जिल्हा रुग्णालयात करून घेतली. त्यात कोरोनाची सुरक्षा पाहून कोरोना चाचणी केली. 

त्यानंतर या मुलीला बाल कल्याण समितीच्या परवानगीने शासकीय बालगृह, अहमदनगर या ठिकाणी तात्पुरता स्वरूपाचा निवारा देण्यात आला. 

नंतर या मुलीच्या पालकांच्या शोध घेऊन, त्यांच्या पाठपुरवठा वारंवार करण्यात आला. त्यामुळे या मुलीचे पालक हे चाईल्डलाईन येथे आले. तिचा पालकांनी रीतसर मुलगी ताब्यात मिळण्यासाठी अर्ज करून चाईल्डलाईनला मदत मागितली. 

त्यानुसार त्या पालकांना बालकल्याण समिती अहमदनगर यांच्यासमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने या पालकांची कागदपत्राची पाहणी करून या अल्पवयीन मुलीस सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !