दहावी, बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात झालाय 'हा' बदल

नवी दिल्ली : कोरोना काळातील संभ्रमावस्थेत गेल्या काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. मात्र, आता सीबीएसई बोर्डाने आपल्या वेळापत्रकात बदल केले आहेत. १० वी आणि १२ वीच्या काही विषयांच्या परीक्षा तारखांमध्ये बदल करण्यात आल्याचे सीबीएसई कडून जाहीर करण्यात आले आहे.

सीबीएसई बोर्डाने बदललेले वेळापत्रक त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्या ठिकाणी ते पाहू शकता.


१२ वीच्या वेळापत्रकातील बदल 

१२ वीच्या विद्यार्थ्यांची सीबीएसई बोर्डाअंतर्गत घेण्यात येणारी फिजिक्स विषयाची परीक्षा १३ मे रोजी होणारी होती. मात्र नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा 8 जून रोजी होईल. तसेच १२ वीच्या गणित विषयाची १ जूनला होणारी परीक्षा आता ३१ मे रोजी घेण्यात येणार आहे. याशिवाय १२ वीच्या विद्यार्थ्यांची वेब अप्लिकेशनची परीक्षा ३ जून ऐवजी २ जूनला होणार, तर भूगोल विषयाची परीक्षा २ जून ऐवजी ३ जून रोजी होणार आहे.

१० वीच्या वेळापत्रकातील बदल

१० वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयाची परीक्षा २१ मेच्या जागी २ जून रोजी होणार, तर फ्रेंच विषयाची १३ मे रोजी होणारी परीक्षा आता १२ मे रोजी होणार आहे. तसेच विज्ञान विषयाची परीक्षा १५ मे ऐवजी २१ मे रोजी होणार तर संस्कृत विषयाची २ जून रोजी होणारी परीक्षा ३ जून रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड याणी थेट विधानसभेतून मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

दहावीसाठी साधारणत 16 लाख तर बारावीसाठी 15  लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !