अहमदनगर : अहमदनगरसाठीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. अहमदनगर पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्या तीन मंत्र्याची प्रतिष्ठा जपण्यातही पोलिसांना यश आले आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील पाच आरोपीना यापूर्वीच अटक केली होती.
हेही वाचा - आरोपी बाळ बोठेच्या अटकेबाबत नाशिकचे 'आयजी' दिघावकर म्हणाले...
मात्र तेव्हापासून बोठे हा फरार होता. मुख्य आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात चालू होती. अखेर हे वृत्त आज खरे ठरले.