शेतकरी विरोधी केंद्राच्या तीन काळ्या कायद्यांविरोधात 'वंचित'चे आंदोलन

शेवगांव : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात तहसील कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेवगांव शहर व तालुक्यातील विविध प्रश्ना बाबत ही निवेदन देण्यात आले. 

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले, वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, शहर अध्यक्ष विशाल ईगंळे, जिल्हा उपाध्यक्ष बन्नूभाई शेख, सागर हवाले, शेवगांव तालुका संघटक  सलीम जिलाणी शेख, जगदिश कांबळे, राजू शेख, बाबासाहेब कांबळे, आदिनाथ आव्हाड, विष्णु वाघमारे, अन्सार कुरैशी, रविन्द्र निळ, छबू ईमाम सैय्यद, अशोक निळ, मधुकर सरसे, सुर्या निकाळजे, उत्तम चित्ते, अमोल आव्हाड, संदिप आव्हाड, देविदास चित्ते, रामेश्वर आव्हाड, रामनाथ तांदळे, अशोक शिंदे, दादाभाऊ गाडेकर, भगवान आंबेकर आदी सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी बांधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

शेवगांव पोलिस ठाण्याचे तर्फे  गोपनीय शाखेचे धाकतोडे मेजर उपस्थित होते. शेतकर्यांच्या हीतकारी व ज्वलंत प्रश्ना करिता चर्मकार विकास संघ यांनी लेखी पत्र देवून जाहीर पांठीबा दिला. या प्रसंगी चर्मकार विकास संघ शेवगांव तालुका अध्यक्ष गोरखभाऊ वाघमारे, युवा चर्मकार विकास संघ अध्यक्ष दिनेश तेलुरे, जिल्हा युवा अध्यक्ष संजय गुजर व ईतर चर्मकार विकास संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

तर तीव्र आंदोलन छेडू : भोसले

शेवगांव तहसिल तर्फे योग्य निर्णय व लेखी पत्र दिल्या नंतर उपोषण थाबंवण्यात आले आहे. जर योग्य न्याय शेतकरी बांधवांना व शिधा पत्रिका धारक, श्रावनबाळ योजना, विधवामहीला, ईतर नागरिकांना न मिळाल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल,असे प्रकाश बापू भोसले म्हणाले.


buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !