दोन दिवस बँकांचा संप...

मुंबई : केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाचा घेतलेल्या निर्णयास कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रतिनिधित्व करणार्या नऊ संघटनांनी खाजगीकरणाच्या विरोधात पुढील आठवड्यात दोन दिवस संप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बँक दोन दीवस बंद राहणार आहेत. 


दोन दिवस १५ आणि १६ मार्च ला आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिणामी सलग दोन दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याचा बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहक अस्वस्थ होण्याची शक्यता जास्त आहे.

या संघटनांनी पुकारला बंद

एआयबीईए, आयबुक, एन.सीबीई, एआयबीओए, बफी, इनबीफ, इनबॉक्स, एनओबीडब्ल्यू आणि नोबो या नऊ संघटनांच्या नेतृत्वाखालील युनायटेड फोरम ऑफ बॅंकांनी हा संप पुकारला आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रातील काही बँक कर्मचार्याच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे की, केंद्र सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास नजीकच्या काळात ते अधिक आंदोलन करतील.

दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी, अधिकाऱयांचा सहभाग

आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात सरकारने केलेल्या घोषणेच्या विरोधात बँक कर्मचारी सोमवारपासून (१५ मार्च) दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील आणि जुन्या जमान्यातील १२ बँका, खासगी, सहा विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी होत आहेत. या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात.

धरणे, मेळावे टाळून प्रत्यक्ष भेटीगाठी - महामारीच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे, मेळावे असे कार्यक्रम संघटितरीत्या करणे शक्य नाही हे लक्षात घेता बँक कर्मचारी तसेच अधिकारी आपल्या ग्राहकांना घरोघर तसेच व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन भेटत आहेत. याखेरीज ते आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटत आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !