खळबळजनक ! अब्जावधी रुपयांवर 'त्यांचा' होता डोळा, पण झाले 'असे' काही

पुणे - पोलिसांच्या सायबर शाखेने शेकडो बंद खातेदारांची पैसे लुटण्यापासून वाचवले आहेत. बँकेच्या  डोरमंट अकाउंट म्हणजेच निष्क्रिय बँक खात्यांची माहिती अनधिकृतपणे मिळवून त्यातील अब्जावधी रुपये लाटण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी एएम न्यूजचे राजेश मुन्नालाल शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्यासह १० आरोपींची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या फिर्यादीवरून या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तब्ब्ल २ अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते रडारवर

आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इतर बँकातील डोरमंट अकाउंटची (निष्क्रिय खाती) माहिती आरोपींनी संगनमत करून अनधिकृतपणे मिळवली होती. या बँक खात्यात जमा असलेले २ अब्ज १६  कोटी २९ लाख रुपये अकाउंट हॅक करून त्यांच्या बँक खात्यात वळणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे आरोपींचा हा प्लॅन पोलिसांनी हाणून पाडला.

'या' सोसायटीत होता आरोपींचा अड्डा

दरम्यान, सिंहगड रस्त्यावरील सन सिटी येथील संपायला सोसायटीत हे सर्व आरोपी भटेवरा यांच्या घरी जमले असताना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी तब्बल २५ लाख रुपये रोख  आणि ४३ लाख ५४ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये दोन वाहनांचाही समावेश आहे. सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी

  1. रविंद्र महादेव माशाळकर (वय ३४)
  2. आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय ३४)
  3. मुकेश हरिश्‍चंद्र मोरे (वय ३७)
  4. राजशेखर यदैहा ममीडा (वय ३४
  5. रोहन रवींद्र मंकणी (वय ३७)
  6. विशाल धनंजय बेंद्रे (वय ४५)
  7. सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय ५४)
  8. राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२)
  9. परमजित सिंग संधू (वय ४२) 
  10. आणि अनघा अनील मोडक (वय ४०)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !