बँका चार दिवस बंद : काय आहे कारण ?

मुंबई : केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाचा घेतलेल्या निर्णयास कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रतिनिधित्व करणार्या नऊ संघटनांनी खाजगीकरणाच्या विरोधात पुढील आठवड्यात दोन दिवस संप करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बँक चार दीवस बंद राहण्याची शक्यता आहे. 

दोन दिवस संप पुकारण्यात आला असला तरी बँका चार दिवस बंदच राहतील. कारण, पुढील आठवड्यात  १५ आणि १६ मार्च ला आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  याआधी म्हणजे १३ मार्चला दुसरा शनिवार आणि १४ मार्च रोजी रविवार असल्याने सुटी आहे. 

परिणामी सलग चार दिवस बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याशिवाय गुरुवारी 11 मार्च रोजी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी असल्याने या आठवड्यात बँका आणखी एका दिवसासाठी बंद राहतील. याचा बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहक अस्वस्थ होण्याची शक्यता जास्त आहे.

या संघटनांनी पुकारला बंद

एआयबीईए, आयबुक, एन.सीबीई, एआयबीओए, बफी, इनबीफ, इनबॉक्स, एनओबीडब्ल्यू आणि नोबो या नऊ संघटनांच्या नेतृत्वाखालील युनायटेड फोरम ऑफ बॅंकांनी हा संप पुकारला आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्रातील काही बँक कर्मचार्याच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे की, केंद्र सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास नजीकच्या काळात ते अधिक आंदोलन करतील.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !