अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पासून : काय काय दडलंय त्यात?

मुंबई : विधीमंडळात आज राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराजे देसाई विधानपरिषदमध्ये अर्थसंकल्प मांडतील. अर्थसंकल्प अधिवेशनाचे आजपासून दुसरे सत्र सुरू झाले आहे.  ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. आजपासून राज्यसभा सकाळी ९ ते दुपारी २ तर लोकसभा संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत कामकाज करेल. 

कोरोना, लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर बजेटकडून सामान्यांच्या भरपूर अपेक्षा आहेत. पेट्रोल-डिझेलमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का याकडे देखील साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भाच्या विकास महामंडळाची मुदत संपली असतांना अर्थमंत्री काय घोषणा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इंधनावरील राज्याचा कर कमी करून अर्थमंत्री सर्वसामान्यांना दिलासा देतात का, याकडेही लक्ष लागले आहे.

दुपारी २ वाजता मांडणार अर्थसंकल्प 

विधिमंडळात आज दुपारी 2 वाजता महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प विधानसभेत तर राज्यमंत्री शंभूराजे देसाई विधानपरिषदमध्ये अर्थसंकल्प मांडतील. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊन यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. राज्यावरील कर्जाचा भार 5 लाख कोटींच्या घरात पोहचला आहे. अशा वेळी अर्थसंकल्पात काय तरतुदी केल्या जातात याची उत्सुकता आहे.

खासदारांसाठी उद्यापासून लसीकरण 

संसदेत कोरोनासंबंधी नियमांसोबतच संसदेत खासदारांसाठी लसीकरणही सुरू होत आहे. ९ मार्चपासून संसदेत खासदारांसाठी लसीकरण मोहिम सुरू होत आहे. ६० वर्षांवरील खासदार या लसीकरण मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. तसेच व्याधी असलेले ४५ वर्षांवरील खासदारही लसीकरण मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !