धक्कादायक | 'म्हणून' ते कुख्यात आरोपी पोलिसाच्या खून खटल्यातून सुटले निर्दोष

अहमदनगर - पोलिस कर्मचारी दिपक कोलते यांचे खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले कुख्यात आरोपी पिन्या कापसे उर्फ सुरेश कापसे बाप्पा विघ्ने आणि एकाची निर्दोष मुक्तता झाली आहे. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. या निकालाने पोलिस दलासह अनेकांना धक्का बसला आहे.


दीपक कोलते हे शेवगांव पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस होते. दि. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी कर्तव्यावर हजर असताना दिपक रावसाहेब कोलते यांचा पिन्या कापसे, दत्ता विघ्ने व संतोष बोबडे यांनी खून केला होता, असे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल होते.

या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल नितीन भताने यांचे तक्रारीवरुन तीनही आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केलेला होता. तेव्हापासून आरोपी पिन्या कापसे व दत्ता विघ्ने हे जेलमध्ये होते. त्यांना न्यायालयाने जामीन दिलेला नव्हता. 

नेमके काय घडले होते ? 

दि. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी पोलीस कर्मचारी नितीन भताने व मयत दिपक कोलते हे कर्तव्यावर हजर होते. ते मुंगी शिवारात गेले असता तिथे पिन्या कापसे व इतर दोघेही होते. यावेळी पिन्या कापसे व इतर दोघांनी धारधार शस्त्राने दिपक कोलते यांचा खून केला होता. 

कशी कळाली आरोपींची नावे ?

दिपक कोलते यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्यांनी स्वतः तोंडी मृत्यूपुर्व जबाब दिला. फिर्यादी नितीन भताने यांचे समक्ष पिन्या कापसे व दत्ता विघ्ने यांनी त्यांचेवर हल्ला केल्याचे त्यांनी जबाबात सांगितले होते. 

पोलिसांसमोर होते मोठे आव्हान

सन २०१५ मध्ये एका पोलीस कर्मचा-यावर हल्ला करुन खून केल्याची घटना राज्यात खुप गाजली होती. याचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले होते. त्यानंतर बरेच दिवस आरोपी पिन्या कापसे व दत्ता विघ्ने हे फरारच होते. नगर पोलिसांना ते सापडतच नव्हते. अखेर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी थरार नाट्यानंतर त्यांना जेरबंद केले. 

भक्कम दोषारोपपत्र तयार केले

पोलिसांनी तपास करुन आरोपींना जेरबंद केले व आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे तपासात केलेल्या महत्वाच्या पंचनाम्यामध्ये सर्व शासकीय पंच होते व त्याद्वारे आरोपींविरुद्ध भक्कम पुरावा उभा केलेला होता. 

यांनी दिली 'कुचकामी' साक्ष

या खटल्यात पंचांच्या साक्षी न्यायालयात नोंदवण्यात आल्या. तसेच संबंधीत कालावधीत शेवगांव पोलिस स्टेशनचे फौजदार नेरकर, पीआय संपत भोसले, अजित लकडे, सुरेश सपकाळे यांच्या साक्षी नोंदवलेल्या होत्या.

ऍड. सतीश गुगळे यांचा प्रभावी युक्तिवाद

आरोपी पिन्या कापसे व दत्ता विघ्ने यांचे वतीने ऍड. सतिश गुगळे यांनी सुनावणीत अनेक आक्षेपार्ह बाबी न्यायालयाचे निदर्शनास आणुन दिल्या. घटनेच्या वेळी मयत पोलीस कर्मचारी दिपक कोलते हे कर्तव्यावर हजर होते, हेच संशयास्पद आहे, असे ते म्हणाले.

मयत दिपक कोलते यांनी दिलेला त्यांचा मृत्यूपुर्व जबाब अत्यंत संशयास्पद असून अविश्वासपात्र आहे, असा बचाव घेऊन त्यासंबंधी उच्च न्यायालयातील व सर्वोच्च न्यायालयातील वेगवेगळ्या निकालांचे संदर्भ त्यांनी न्यायालयात सादर केले. 

पोलिसांचे पुरावे निघाले बनावट ? 

आरोपींना केवळ खोटेपणाने या प्रकरणात गुंतवले आहे. त्यांचेविरुद्ध पोलिसांनी बनावट पद्धतीने पुरावे सादर केलेले आहेत, व केवळ पोलीस कर्मचा-याचा खून झाला म्हणून आरोपींविरुद्ध पुरावे तयार केले आहेत, असा प्रखर युक्तीवाद विधिज्ञ गुगळे यांनी केला.

'ते' पुरावे ठरले 'अविश्वासपात्र'

पोलिसांनी आरोपींविरुद्ध कागदोपत्री भक्कम केस उभी केली होती. परंतु आरोपीच्या वतीने ऍड. सतिश गुगळे यांनी पोलिसांनी सादर केलेले पुरावे 'पोकळ' व 'अविश्वासपात्र' असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणुन दिले.

..आणि म्हणून आरोपी ठरले 'निर्दोष'

वरील सर्व साक्षीपुराव्यांचा व गुणदोषाचा विचार करुन जिल्हा व न्यायालयाने गुरुवारी याप्रकरणी निकाल जाहीर केला. कारागृहात असलेले आरोपी पिन्या कापसे, बाप्पा विघ्ने व जामिनावर खुला असलेला संतोष बोबडे याची 'या' खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. 

'या' वकिलांनी जिंकला खटला

आरोपी पिन्या कापसे व दत्ता विघ्ने यांचे वतीने ऍड. सतिश गुगळे यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांना सहायक वकील महेश देवणे, हेमंत पोकळे, संदिप शेंदुरकर, शाम घोरपडे, विशाल पठारे यांनी सहकार्य केले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !