अखेर 'त्या' अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार

शेवगाव : शहरातील विद्यानगरमधील एका अनधिकृत बांधकामाविषयी दाखल तक्रारीची दखल घेऊन त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केले जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेच्या टाऊन प्लॅनिंग व अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस देऊन कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रभाग १२ मधील विद्यानगर परिसरात संबंधित अनधिकृत बांधकाम हे दुसुंगे सुरुजी व नेव्हल गुरुजी यांचे असल्याची लेखी तक्रार येथील एका जबाबदार नागरिकाने नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. तक्रारदाराने नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांच्याकडे लेकी तक्रार केली आहे. 

या तक्रारीत म्हटले आहे की संबंधित बांधकाम हे पूर्णपणे अनधिकृत आणि अतिक्रमित आहे. या ठिकाणच्या रहिवाश्यांसाठी असलेल्या २० फुटी रस्त्यावरच अतिक्रमण करून ही तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. याशिवाय ही इमारत अनधिकृत देखील असल्याचे नमूद केले आहे. 

नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीच्या नियमांचे उल्लंघन करून ती बांधण्यात अली आहे. सुमारे पावणेदोन गुंठे जागेवर चारही बाजूने कुठलीही जागा न सोडता पूर्णपणे बांधकाम करण्यात आले आहे. अशा प्रकारे केलेल्या या अनधिकृत व अतिक्रमित बांधकामावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

तपासणीत आढळल्या अक्षम्य त्रुटी

अनधिकृत बांधकामाबाबत अर्ज प्राप्त होताच नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाचे टाऊन प्लॅनींग विभागाचे अधिकारी पठाण यांनी सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणास भेट देऊन सदर अनधिकृत व अतिक्रमित बांधकामाची तपासणी केली. या तपासणीत सदर बांधकाम रस्त्यावर अतिक्रमण करून बांधल्याचे निदर्शनास आले असल्याची निदर्शनास आले आहे. 

तसेच सदर बांधकाम हे नगरपरिषदेचा बांधकाम नियमांना धरून झाले नसल्याचेही स्पष्ठ झाले आहे. याबाबत संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असून यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे टाऊन प्लॅनिंग विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

मुख्याधिकाऱ्यांचे अभय का ?

दरम्यान, या तक्रार अर्जात मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. संबंधित तक्रारदाराने वर्षभरापूर्वीच या अनधिकृत व अतिक्रमित बांधकामाबद्दल मुख्याधिकारी गर्कळ यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्याबाबत पाठपुरावा देखील केला. मात्र, मुख्याधिकाऱ्यानी अद्याप या बांधकामावर कुठलीही कारवाई न केलेली नाही. 

त्यामुळे मुख्याधिकाऱयांकडून या अनधिकृत व अतिक्रमित बांधकामाला अभय का दिले जातेय, असा थेट सवाल करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारे अनधिकृत बांधकामास पाठीशी घालणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. 

गुरुजींच बेकायदेशीर, मग इतरांचे काय?

अनधिकृत बांधकामाचे दोघेही मालक हे गुरुजी असून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सेवेत आहेत. गुरुजी हे समाजातील एक प्रतिष्टीत व जबाबदार घटक असतात.. मात्र अशा जबाब गुरुजींनीच रस्त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करत इतर रहिवाशांचा रस्ता अडविल्यास या बेजबाबदार गुरुजींकडून समाजाने कुठला आदर्श घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. 

'त्या' गुरुजींवर कायदेशीर कारवाई व्हावी

सरकारी नोकरीत असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारे अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमण करणे बेकायदेशीर आहे. तसेच अशा बेजबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्याची कायदेशीर तरतूद आहे. यानुसार संबंधित दोनीही गुरुजींवर पंचायत समितीच्या शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित तक्रारदाराने केली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !