'MBP Live24' चा दणका | 'त्या' अनधिकृत बांधकामधारक शिक्षकांची आता नोकरीही धोक्यात

शेवगाव - शहरातील विद्यानगर येथे अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण केल्याचे प्रकरण 'MBP Live24'ने उजेडात आणले होते. या संबंधित शिक्षक गोरक्षनाथ विठ्ठल दुसुंगे, अविनाश नेव्हल आणि सुलभा अविनाश नेव्हल यांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. 

यापूर्वी नगरपरिषदेने त्यांना अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश नोटिशीद्वारे दिलेले असताना आता याच कारणामुळे त्यांच्यावर खात्यांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतची नोटीस गटशिक्षणाधिकारी रा. आ. कराड यांनी ढोरजळगाव जि.प. शाळेवर कार्यरत शिक्षक दुसुंगे यांना दिली आहे. 

याशिवाय नेव्हल दाम्पत्याच्या विरोधात खात्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी देखील औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या तिघांवरही खात्यांतर्गत बडतर्फीची कारवाई होणार असल्याने त्यांची नोकरीही आता धोक्यात सापडली आहे.

शहरातील विद्यानगरमधील अनधिकृत बांधकामाविषयीचे वृत्त  'MBP Live24' ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन 'त्या' अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश शेवगाव नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वीच दिले आहेत. तशी नोटीस संबंधित अनधिकृत बांधकामधारकांना देण्यात आली आहे. 

प्रभाग १२ मधील विद्यानगर परिसरात संबंधित अनधिकृत बांधकाम हे दुसुंगे गुरुजी व नेव्हल गुरुजी यांचे असल्याची लेखी तक्रार येथील जबाबदार नागरिक ऍड. उमेश अनपट यांनी नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडे केली होती. 

याशिवाय अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या सरकारी सेवेत काम करणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंग केल्या प्रकरणी कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी लेखी तक्रार देखील शेवगाव पंचायत समितीचे बीडीओ डोके आणि गटशिक्षणाधिकारी रा. आ. कराड यांच्याकडे केली होती.


नोटीसीत काय म्हटलंय...

त्यानुसार अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम केल्याबाबत गटशिक्षणाधिकारी कराड यांनी शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत उपाध्यापक गोरक्षनाथ विठठल दुसुंगे यांना करणे दाखवा नोटीस काढली आहे.

नोटीसीत म्हटले आहे, की आपण सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता अडवून त्यावर अतिक्रमण करत तीन मजली बांधकाम केल्याने रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. 

तरी आपण जिल्हा परिषद सेवा व शिस्त अधिनियम १९६४ (३)/(४) नुसार कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याचे दिसुन येते. सबब आपणावर महाराष्ट्र जिल्हा सेवा व शिस्त अधिनियम १९६४ (३) अन्वये शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित करु नये याचा लेखी खुलासा २ दिवसांत सादर करावा. 

खुलासा मुदतीत व समाधानकारक न आल्यास काहि एक म्हणणे नाही असे समजुन आपल्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद ध्यावी. संबंधित नोटीसीची प्रत जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) अहमदनगर आणि गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती, शेवगांव यांना पाठविण्यात आली आहे.

दुसुंगेंचा प्रताप : अनधिकृत घरात बेकायदेशीर क्लास - संबंधित दुसुंगे गुरुजी हे याच अनधिकृत घरात बेकायदेशीर क्लास देखील चालवतात. स्वतः जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून सरकारी नोकरीत असताना घरात क्लास घेणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम 1967, तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 नुसार कार्यालयीन शिस्तभंग केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी ऍड. अनपट यांनी केली आहे.

नगरपरिषदेने काय दिलेत आदेश

नगरपरिषदेने अनधिकृत बांधकाम करणारे गोरक्षनाथ विठ्ठल दुसुंगे व सुलभा अविनाश नेव्हल यांना अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश नोटिशीद्वारे दिले आहेत. 

नोटिशीत म्हटले आहे, की आपण उतारा क्रमांक ९५७ / १  व ९५७ / २ या जागेवर केलेले बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या विरुद्ध आहे. 

सदर अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ क १ व ५४ नुसार कार्यवाही करण्यात येईल.  

काय होती तक्रार?

तक्रारीत म्हटले आहे की संबंधित बांधकाम हे पूर्णपणे अनधिकृत आणि अतिक्रमित आहे. या ठिकाणच्या रहिवाश्यांसाठी वहिवाटीच्या २० फुटी रस्त्यावरच अतिक्रमण करून ही तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे. 

याशिवाय ही इमारत अनधिकृत देखील असल्याचे नमूद केले आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीच्या नियमांचे उल्लंघन करून ती बांधण्यात अली आहे. सुमारे पावणेदोन गुंठे जागेवर चारही बाजूने कुठलीही जागा न सोडता पूर्णपणे बांधकाम करण्यात आले आहे. 

अशा प्रकारे केलेल्या या अनधिकृत व अतिक्रमित बांधकामावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. 

तपासणीत आढळल्या होत्या त्रुटी

अनधिकृत बांधकामाबाबत अर्ज प्राप्त होताच नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाचे टाऊन प्लॅनींग विभागाचे अधिकारी पठाण यांनी सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणास भेट देऊन सदर अनधिकृत व अतिक्रमित बांधकामाची तपासणी केली. 

या तपासणीत सदर बांधकाम रस्त्यावर अतिक्रमण करून बांधल्याचे निदर्शनास आले. तसेच नगरपरिषदेच्या बांधकाम नियमांना तोडून इमारत उभारल्याचे निदर्शनास आले आहे. 

गुरुजींच बेकायदेशीर, मग इतरांचे काय?

अनधिकृत बांधकामाचे दोघेही मालक हे गुरुजी असून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सेवेत आहेत. गुरुजी हे समाजातील एक प्रतिष्टीत व जबाबदार घटक असतात.. 

मात्र अशा जबाबदार गुरुजींनीच रस्त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करत इतर रहिवाशांचा रस्ता अडविल्यास या बेजबाबदार गुरुजींकडून समाजाने कुठला आदर्श घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. 


buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !