शेवगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी राबविण्यात येत असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा 'ग्राउंड इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट' लवकरच 'MBP Live24' वाचकांसमोर मांडणार आहे.
दरम्यान, नगरपरिषदेचा पाच वर्षांचा कालावधी संपल्याने ती विसर्जित झाली. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासक म्हणून प्रांत अधिकारी देवदत्त केकान यांची नियुक्ती केली.
आतापर्यंत पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेचा 'MBP Live24' बारकाईने अभ्यास केला आहे. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने अनेक वेळा, विविध ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमांना अक्षरशः फाटा देऊन 'सदोष' पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया हाताळली आहे.
आमचे मुख्य संपादक ऍड. उमेश अनपट यांच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये अनेक गंभीर त्रुटी, आक्षेपार्ह बदल आणि आणखी बरेच 'अ'संविधानिक हस्तक्षेप आढळून आले आहेत. त्याचा फटका थेट मतदारांनाच बसणार आहे. लोकशाही मधील सर्वात महत्वाच्या मतदान करण्याच्या संविधानिक अधिकारांवरच गदा येऊ पहातेय. त्यामुळे या सर्व निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नेमके कोणते कायदे, नियम पायदळी तुडविण्यात आलेत, हा सर्व प्रताप कोणी?, कशासाठी आणि का? केला या सर्व 'इन्व्हेस्टिगेशन' चा रिपोट 'MBP LIVE 24' आपल्या वाचकांसमोर 'मालिका' स्वरूपात मांडणार आहे. आपण तयार रहा जाणून घ्यायला, की भारतीय राज्यघटनेने दिलेल्या तुमच्या संविधानिक अधिकारांवर, हक्कावर कसा बुलडोझर फिरवला गेलाय आणि या पुढेही फिरविण्याचे मनसुबे आहेत. त्यामुळे 'MBP LIVE 24' वाचत रहा. आणि संपर्कात राहा. म्हणजे, हा 'तहलका' माजवणार 'ग्राउंड इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट'च्या मालिकेतील एकही भाग पाहण्यापासून तुम्ही मुकणार नाहीत यासाठी..! - ऍड. उमेश अनपट, मुख्य संपादक