नवी दिल्ली - अवैध दारू धंदे आणि अल्पवयीन तरुण तरुणीच्या मद्यपानविरुद्ध केजरीवाल सरकारने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दारूच्या दुकानांसाठी अनेक नवीन नियम जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
देशात अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाने अवैध धंदे चालवले जातात. त्यामुळे देशातील तरुण वर्ग अगदी कमी वयातच दारू पिण्याकडे आकर्षिला जातो. त्यावर दिल्ली सरकारने मोठी पावले उचलली आहेत.दिल्लीच्या एक्साइड पॉलिसीमध्ये केजरीवाल सरकारने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ज्यामुळे राजधानीतील अवैध दारूची दुकाने बंद केली जाणार आहेत. यासोबतच दारूच्या दुकानांसाठी अनेक नवीन नियम जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
कायदेशीर वय 21 वर्षे
उत्पादन शुल्क महसूलातही या नवीन नियमांमुळे 20 टक्के वाढ होणार आहे. त्याचबरोबर अल्पवयीन तरुण तरुणीच्या मद्यपानविरुद्ध केजरीवाल सरकारने नवीन मोहीम राबवायला सुरुवात केली जाणार आहे.
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशप्रमाणे आता दिल्लीतही दारु पिण्याचे कायदेशीर वय 21 वर्षे करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्यांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी असेल, अशांना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असेल.
त्यामुळे कमी वयात दारुच्या व्यसनाकडे वळणाऱ्या तरुणांना काही प्रमाणात का होईना पण आवर घालता येणार आहे.