नितीन काळदाते यांची कर्नलपदी नियुक्ती

नाशिक : कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात (अहमदनगर) चे सुपुत्र  नितीन सुभाष काळदाते यांची नुकतीच कर्नल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथील रहिवासी नितीन सुभाष काळदाते यांनी १७ कुमाऊ बटालियनचे कमाडिंग ऑफिसर म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. 

कर्नल नितीन काळदाते यांनी आपल्या सैनिकी सेवेमध्ये जम्मू काश्मीर येथे काम पाहत असताना यापूर्वी लेप्टन कर्नल म्हणून काम पाहिले आहे.

चिंचोली काळदात येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील कर्नल काळदाते यांचे प्राथमिक शिक्षण जगदंबा फॅक्टरी (राशिन) येथे झाले असून त्यांनी पाचवी ते बारावी हे शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे घेतले. कर्नल नितीन काळदाते हे रातंजन येथील मा. सरपंच व सेवानिवृत्त सुभेदार गौतम माने यांचे भाचे आहेत.

कर्नलपदी नियुक्ती झाल्याने कॅप्टन तुषार माने यांच्यासह कर्जत तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर नियुक्ती होणारे कर्नल नितीन काळदाते हे कर्जत तालुक्यातील पहीले कर्नल ठरले आहेत. कर्नल काळदाते हे जम्मू काश्मीर या ठिकाणी सेवेत कार्यरत आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !