निरव मोदीला लंडन न्यायालयाचा दणका ; दिले 'हे' आदेश

लंडन: पीएनबी घोटाळ्यातील फरार हीरा व्यापारी नीरव मोदीच्या प्रत्यार्पणास लंडनच्या न्यायालयाने मंजुरी दिली आहे. या प्रकरणी गुरुवारी अखेरची सुनावणी झाली. या निकालाने निरव मोदीच्या भारताकडे प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असून त्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. 

लंडनमध्ये न्यायाधीश सॅमुअल गूजीने यांच्या समोर झालेल्या व्हर्चुअल हिअरिंग झाली. यावेळी न्यायाधीशांची मेनी केले की पुरावे नष्ट करण्याचा आणि साक्षीदारांना घाबरवण्याचा नीरव मोदीने प्रयत्न केला. तसेच भारतात सुरू असलेल्या खटल्यात नीरव मोदीला उत्तर द्यावे लागेल, असे निरीक्षणही नोंदविले. भारतात नीरव मोदीला पाठवले जाणार म्हणजे, तिथे त्यांना न्याय मिळणार नाही, असे नाही. त्याचबरोबर नीरव मोदीची मानसिक स्थिती ठीक नसल्याच्या युक्तिवादाचेही न्यायालयाने खंडन केले. 

पंजाब नॅशनल बँकेच्या 14 हजार कोटींपेक्षा जास्तीच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी सध्या लंडनमधील वांड्सवर्थ जेलमध्ये बंद आहे. भारताकडे त्याचे प्रत्यार्पण करण्याचे प्रकरण सुरू होते. न्यायालयाच्या निकालानंतर ही बाब अंतिम मंजुरीसाठी ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्याकडे जाईल.


निरवच्या वकिलांचा युक्तीवाद

नीरवच्या वकीलांनी सुनावणीदरम्यान दावा केला की, नीरव मानसिक आजारी आहे. यासोबतच नीरवला भारतातील तुरुंगात योग्य व्यवस्था मिळणार नसल्याचेही म्हटले. 


भारताच्या वकिलांचा युक्तिवाद

दरम्यान, भारतीय एजंसीकडून क्राउन प्रॉसिक्यूशन सर्व्हिस प्रकरणात युक्तीवाद मांडत आहे. सीपीएसच्या बॅरिस्टर हेलन मॅल्कम म्हटल्या होत्या की, प्रकरण एकदम स्पष्ट आहे. नीरवने तीन पार्टनर असलेल्या आपल्या कंपनीमधून अब्जो रुपयांचा बँक घोटाळा केला आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !