नाशिक : नाशिक महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या 8 सदस्यांच्या नियुक्तीसाठी आज महासभा घेण्यात येणार आहे. हि सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
न्यायालयाने निर्णय दिल्याने स्थायी समितीमधील सेनेचा एक सदस्य वाढणार आहे. तर भाजपाचा एक सदस्य कमी होणार आहे. त्यानुसार आता भाजपाचा कोणता सदस्य कमी होणार आणि सेनेचा कोणता सदस्य वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडींसाठीच्या निवडणुकीत मनसेची भूमिका शिवसेनेच्या दृष्टीने महतवाची ठरणार आहे. मनसे शिवसेनेसाठी तारक ठरते कि मारक हे निवडणुकीनंतरच समजेल.