गुजरात महापालिका निवडणूक : भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसचा धुव्वा

अहमदाबाद : गुजरातमधील सहा महापालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. कोंर्ग्रेसचा मात्र सपशेल धुव्वा उडाला आहे. अहमदाबादसह सहा पालिकेतील ५७६ पैकी किमान ४४९ जागा भाजपने जिंकल्या आहेत.

अहमदाबाद (१९२), राजकोट (७२), जामनगर (६४), भावनगर (५२), बडोदा (७६) आणि सुरत (१२०) महानगरपालिकांसाठी रविवारी मतदान झाले. त्याची मतमोजणी मंगळवारी झाली. मतमोजणी झालेल्या जागांपैकी ४४९ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे. त्यातील केवळ ४३ जागांवरच  काँग्रेसला समाधान मानावे लागले.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मतदार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विकासाच्या राजकारणाचा हा विजय आहे, असे ट्वीट रूपाणी यांनी केले.

सुरतमध्ये आपचा झेंडा 

आम आदमी पक्षाने राज्यातील सहा महापालिकांमध्ये ४७० उमेदवार उभे केले होते. त्यापैकी सुरतमध्ये १२० जागांपैकी २७ जागांवर ‘आप’चा विजय झाला आहे. 'आप'वर विश्वास दाखवत गुजरातमधील राजकारणात शिरकाव करण्याची संधी मतदारांनी या विजयाद्वारे 'आप'ला  दिली आहे. मात्र याच ठिकाणी काँग्रेसला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !