ट्विट द्वारे शरद पवार यांची मोठी घोषणा

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्शवभूमीवर 'माझे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करत आहे', अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट द्वारे दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. 


शरद पवार याणी ट्विट केले आहे, की "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व  नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत."


शरद पवार क्वारंटाईन होणार का?

दरम्यान, रविवारी नाशिक येथे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त पालकमंत्री छगन भुजबळ हे  शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या सोबत उपस्थित होते. मात्र, छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळीच आपली कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट द्वारे दिली होती. त्यामुळे आता शरद पवार व अजित पवार क्वारंटाईन होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !