धक्कादायक : कोरोना संकटात लोकांच्या अज्ञानाचा असा घेतला जातोय गैरफायदा

नागपूर : कोरोनावर लसीखेरीज अजून पर्यंत कोणतेही औषध अस्तित्वात नसताना लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा काही जण घेत असल्याची धक्कादायक बाब नागपूरमध्ये समोर आली आहे.  बूस्टर ड्रिंक आणि काढा घेतल्यावर मास्क लावण्याचीही गरज नाही अशी बतावणी करून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे तेथील महापौर आणि अतिरिक्त आयुक्त यांनी एका क्लबवर टाकलेल्या धाडीत उघड झाले आहे. राज्यात इतर ठिकाणीही अशीच फसवणूक होत असल्याची शक्यता असून त्यापासून लोकांनी सतर्क रहायला हवे.


नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांना सोबत घेऊन शहरातल्या जुना सुभेदार ले-आऊट इथल्या एका क्लबवर धाड टाकली. त्यावेळी 450 स्क्वेअर फूट खोलीत दीडशेहून जास्त लोकांनी गर्दी केलेली आढळून आले. त्या क्लबमध्ये इम्युनिटी बूस्टर हेल्थ ड्रिंक आणि काढ्याची विक्री सुरू होती. विशेष म्हणजे हेल्थ ड्रिंक घेतल्यानंतर मास्कही लावण्याची गरज नसल्याची बतावणी या विक्रेत्यांकडून करण्यात येत होती. 

या प्रकरणी क्लब संचालकाला 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तर इन्मुनिटी बुस्टर हेल्थ ड्रिंक्सबाबत एफडीएकडे अहवाल पाठवण्यात आला आहे. 

कोरोना उपचाराबाबत कुठल्याही भूलथापांना बळी न पडता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून स्वतः सह कुटूंब सुरक्षित ठेवणे निकराचे बनले आहे. 

विदर्भासह राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद झाले असताना, नागपुरात समोर आलेला हा धक्कादायक प्रकार गंभीर आहे. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, स्वतःची तिजोरी काही स्वार्थी लोक भरत असल्याचे दिसून येत आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !