पुणे : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. दहावी बोर्डाची लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावी बोर्डाची लेखी परीक्षा ही 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी परीक्षा कशी होणार याबाबत अजून माहिती पुढे आलेली नाही. राज्य शिक्षण मंडळाकडून परीक्षेच्या फक्त तारखा जाहीर करण्यात आल्या. यावर्षी कोरोनामुळे विविध मंडळांच्या परीक्षा उशीराणे होणार असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिले होते.
शाळा आणि महाविद्यालयांना तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा कधी होणार हे परीक्षेच्या आधी कळविण्यात येणार आहे. इतर कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत माहिती जाहीर केली जाईल. सोशल मीडियावर व्हायरल वेळापत्रकारवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकांना आणि विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.