दहावी, बारावी परीक्षा : बोर्डाने घेतला 'हा' निर्णय

 मुबई: कोरोना प्रसार राज्यात वाढत असताना वाढता धोका लक्षात घेऊन दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन यावर चर्चा सुरू होती. मात्र आता परीक्षा ऑफलाईनच घेणार असल्याचा निर्णय बोर्डाने घेतल्याचे समजते. 

ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. 

कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हते. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने ऑनलाईन परीक्षा घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


दहावीचे १६ लाख, बारावीचे १४ लाख विद्यार्थी

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा बोर्डाचा आग्रह आहे. 15 दिवसांनंतर राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन परीक्षांबाबत शिक्षण विभाग अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी बसले आहेत. सध्या तरी परीक्षा ऑलाईनच होतील असेच दिसतेय.


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !