राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱयांसाठी नाही : शरद पवार

  शरद पवार यांनी गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे उपटले कान 


मुंबई : असा राज्यपाल आम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिला नाही. अभिनेत्री कंगना राणावतला भेटायला त्यांना वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही, अशी टीका करत शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मुंबईत आयोजित संयुक्त शेतकरी कामगार मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलेच कान उपटले आहेत.  केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.  

 


शरद पवार म्हणाले, मला शेतकरी कामगार मोर्चाच्या आयोजकांनी सांगितले की सभेनंतर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने एक निवेदन देण्यात येणार आहे. मात्र, लाखोंच्या संख्येने मुंबईत शेतकरी येणार आहेत, राज्यपालांना भेटून फक्त निवेदन देणार आहेत. असे असताना राज्यपाल गोव्याला गेले. पण असे राज्यपाल महाराष्ट्राच्या इतिहासात आम्हाला भेटले नाही. कंगनाला भेटायला त्यांना वेळ आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नसल्यामुळे आता हे निवेदन कुठे आणि कोणाला द्यायचे आणि त्याचे काय करायचे याचा विचार करावा लागेल.


राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. खरं म्हणजे याला त्यांनी सामोरे जायला हवे होते. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवे होते. पण तेही धैर्य त्यांनी दाखवले नाही. त्यावर मी अधिक बोलू इच्छित नसल्याचेही शरद पवार यांनी राज्यपालांना खडसावले.



Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !