महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी राष्ट्रपती पोलीस पदकांवर उमटवली मोहोर

 नवी दिल्ली : नुकतीच पोलिसांसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणा-या राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे. पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

राष्ट्रपती पोलिस पदक महाराष्ट्रातील ज्या 57 पोलिसांना मिळाले आहेत, त्यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, राज्यातील 13 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर राज्याला 40 पोलीस पदक मिळाले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती जनतेसाठी दिवसरात्र झटणा-या पोलिसांसाठी पदकांच्या स्वरुपात त्यात अविरत कामाला सलाम करण्यासाठी ही पदके दिली जातात. वेळप्रसंगी आपल्या कुटूंबाला दूर लोटून इतरांचे कुटूंब सुरक्षित राहावे म्हणून स्वत:च्या घरापासून दूर राहतात.  यासह राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देखील घोषित करण्यात आले आहेत. यात 4 मुले आणि एका मुलीचा समावेश आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !