नाशिक - नाशिक महापालिकेच्या गटनेता कार्यालयाला शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. कुठलीही जिवीतहानी झाली नसून आग आटोक्यात आल्याचे समजते.
शिवसेना गटनेते विलास शिंदे यांच्या कक्षाला आग लागली. राजीव गांधी भवन मधील हा कक्ष दुसऱ्या मजल्यावर आहे. या आगीमुळे महापालिकेच्या मुख्यालयात एकच खळबळ उडाली. आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाला असून जीवितहानी झाली नसल्याचे कळते.