प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱयांची ट्रॅक्टर परेड

 दिल्ली पोलिसांची ट्रॅक्टर  परेडला परवानगी

मुंब ई : प्रजासत्ताक दिनी राजपथ वरील संचलनाबरोबरच यंदा दिल्लीत होणारी आंदोलक शेतकऱयांच्या ट्रॅक्टर परेड ची ओढ लागली आहे. मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढण्यास दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांना परवानगी दिली आहे. मात्र, राजपथावरच्या संचलनाला कोणतीही बाधा येऊ नये, ट्रॅक्टर परेड संपूर्णपणे शांततेत काढावी ही अट पोलिसांनी घातली आहे.

दिल्लीच्या वेशीवर गेले तीन महिने ठाण मांडून बसलेले हजारो शेतकरी २६ जानेवारीला आपली स्वतंत्र ट्रॅक्टर परेड काढणार आहेत. दिल्ली पोलिसांनी या परेडला परवानगी देताना शांतता राखण्याचे व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

दरम्यान महाराष्ट्रातल्या २१ जिल्ह्यातून गेलेल्या हजारो शेतकऱयांचा कडाक्याच्या थंडीत मुंबईच्या आझाद मैदान परिसरात तीन दिवस शेतकर्यांचा मुक्काम होता. हे शेतकरी २६ जानेवारी ला आझाद मैदानात प्रजासत्ताक दिनादिवशी ध्वजारोहण करणार आहेत.

राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातल्या या शेतकर्यांचा पाठिंबा आहे. त्यासाठी सत्याग्रह करण्यासाठी हे शेतकरी आले आहेत. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शेतकर्यांना संबोधित केले. शेतकरी नेते आपले पत्र राज्यपालांना देणार होते परंतु राज्यपाल त्यांना न भेटताच गोव्याला निघून गेले.

नाशिकमधून सुमारे १५ हजारहून अधिक शेतकरी सहभागी

राज्यातले शेतकरी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली मुंबईत येत असून नाशिकमधून अखिल भारतीय किसान सभेचे सुमारे १५ हजारहून अधिक शेतकरी रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहेत. हे सर्व शेतकर्यानी तीन दिवसांचे धरणे आझाद मैदानात दिले. या आंदोलनाला सत्ताधारी महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याने आंदोलकांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दखल घेतली जात आहे. मुंबईत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. आझाद मैदानात राज्यातले हजारो शेतकरी जमा होत असल्याने भव्य मंडप व अन्य मदत उभी केली गेली आहे.




Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !