नाशिक : सरकारच्या जल शक्ती मंत्रालयातर्फे "वॉटर हिरो" सन्मान देऊननखेड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण करणाऱ्या सोशल नेटवर्किंग फोरमचा (एसएनएफ) गौरव करण्यात येणार आहे.
देशात पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे यासाठी "Water Heroes - Share your Story Contest" या योजनेंतर्गत देशभरातील संस्थांची दर महिन्याला माहिती घेतली जाते. त्यातल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना १० हजार रुपये आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते. यातील ऑक्टोबर २०२० या महिन्याच्या "वॉटर हिरो" सन्मानासाठी सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानाची निवड झाली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून 'एसएनएफ'चे अभिनंदन होत आहे.
जलाभियानातील 'एसएनएफ'चे नाशिक जिल्ह्यातील कार्य वाखाणण्याजोगे आहे.
यशाचे श्रेय 'एसएनएफ'च्या टीम चे
या यशाचे श्रेय एसएनएफच्या जलाभियानात आर्थिक योगदान देणारे देशविदेशातील सदस्य, श्रमदान करणारे गावकरी, आमचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून लोकसहभाग वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रसिद्धी माध्यमे आणि विनामोबदला आपले कौशल्यज्ञान पुरवून खेड्यांना टँकरमुक्त करणाऱ्या आमच्या टिमला जाते.
-प्रमोद गायकवाड, सोशल नेटवर्किंग फोरम