काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चढले स्फुरण
शेवगाव : शेवगाव (जि. अहमदनगर) तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधून काँग्रेसने कमबॅक केल्याचे चित्र निवडणूक निकालांद्वारे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून मरगळुन अडगळीत गेलेल्या काँग्रेसकला नवसंजीवनी प्राप्त झाल्याने पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह संचारला आहे.
या ग्रामपंचायत निवडणुकांत काँग्रेस पक्षाने काही गावांत स्वतंत्ररीत्या तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विविध संघटनांशी युती करून, काही ठिकाणी पक्ष विचारांचे उमेदवार देऊन निवडणुका लढवल्या. काही गावांत स्थानिक आघाड्यांना पाठिंबा दिला. त्यात ताजनापूर, बोडखे, घोटन, चापडगाव, वाडगाव, अंतरवाली आदी ठिकाणी पक्षाचे व पाठिंबा दिलेले उमेदवार निवडून आले.
अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व शेवगाव तालुका काँग्रेस
नामदार बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभर काँग्रेस पक्षाने जोरदार विजयी सुरुवात केली असून शेवगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे उमेदवार आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये विजयी झाले.
सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये शेवगाव तालुक्यातील ताजनापुर, बोडखे, दहिफळ, घोटन गदेवाडी, चापडगाव, आंतरवाली, दहीफळ अशा अनेक ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले असून त्याबद्दल शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
आमचे विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष सुनील गोर्डे, मल्लिकार्जुन ग्रामविकास पॅनल घोटनच्या सौ. पुष्पा पवार, बजरंग ग्रामविकास पॕनल बोडखे मधून साईनाथ धावणे, शनैश्वर ग्रामविकास पॕनल ताजनापुरच्या सौ. मीराबाई उत्तम नाबदे, सौ. स्वाती सचिन बेळगे, नारायन बलीया, यांच्यासह अनेक विजयी उमेदवारांचे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शक आ.डॉ. सुधीरजी तांबे, अहमदनगर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा. शिवाजीराव काटे, शेवगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. अमोल फडके, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बब्बू भाई शेख, सेवादलाचे अध्यक्ष रामकिसन कराड, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कापरे, उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष महेश काटे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाला पुन्हा नवसंजीवनी मिळाली असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
आता लक्ष शेवगाव नगरपरिषद...काल, सोमवारी जाहीर झालेले ग्रामपंचायत निवडणुकीतील यशामुळे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अंगावर मूठभर मांस चढले आहे. ग्रामपंचायत निवडणूक आमच्यासाठी रंगीत तालीम ठरली. हा जोश आणि ताकद घेऊन काँग्रेस शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून विजयी पताका फडकविणार, असा विश्वास आहे. त्यादृष्टीने जोरदार बांधणी केली आहे. ही लढाई देखील आम्ही जिंकू, असा निर्धार अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा. शिवाजीराव काटे यांनी व्यक्त केला आहे.