उपक्रमास रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शहरातील सर्व स्टँड प्रमुख उपस्थित
पिंपरी - 'पिंपरी-चिंचवड शहरात मीटर प्रमाणे भाडे आकारून रिक्षा सेवा मिळावी', या नागरिकांच्या मागणीची दखल घेत आज येथील पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः रिक्षाचे मीटर डाऊन करत रिक्षाने प्रवास करत मीटर डाऊन रिक्षा प्रवासास सुरुवात करून दिली. यावेळी रिक्षा भाड्याचे कृष्ण प्रकाश यांनी ऑनलाईन पेमेंट केले.
पिंपरी-चिंचवड शहरात मीटरने रिक्षा व्यवसाय सुरू व्हावा, यासाठी शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी संघटना यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची भेट घेऊन मीटरने रिक्षा सुरू करण्याची मागणी केली होती, याबाबत कृष्ण प्रकाश यांनी वाहतूक विभागास शहरात मीटरने रिक्षा सुरू सुरू कराव्यात असे आदेश दिले होते.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले यांनी रिक्षा संघटनाशी चर्चा करून शहरात रिक्षा मीटरने चालवण्यास कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन शहरात मीटर सुरु होण्या संदर्भात प्रयत्न केले आहे.
गुरुवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रातराणी रिक्षा स्टँडवर रिक्षा मीटर डाऊन करुन या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
यावेळी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हेरीमठ, मंचक इप्पर,सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आधे, सुबोध मेडसीकर, पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे,राजेंद्र कुंटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, आशा कांबळे, बाळासाहेब ढवळे, संजय दौडकर, धनंजय कुदळे आदी उपस्थित होते.
यावेळी कृष्ण प्रकाश म्हणाले, आता अधुनिकरण आणि काळाच्या सुसंगत राहून रिक्षा चालकांनी स्वता मदे बदल केले पाहिजे, विरोधाला विरोध न करता सकारात्मक भूमिका घेऊन बाबा कांबळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन शहरात मीटरने रिक्षा सुरू करणे संदर्भात प्रयत्न केले आहेत, प्रशासन देखील रिक्षा चालकांच्या सोबत असून शहरांमध्ये रिक्षा स्टँड वाढवणे आणि फायनान्स कंपनी कडून जबरदस्तीने रिक्षा ओढून घेऊन जात असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रवाशांना देखील मीटरने रिक्षा सुविधा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत असून रिक्षा बद्दल तक्रारी आल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, याबद्दल नागरिकांनी मीटर ने प्रवास करावा, मीटरने भाडे देण्यास नकार देऊ नये प्रवाश्यांनी रिक्षा चालकांची तक्रार आमच्याकडे करावी तक्रार असल्यास कायदेही कारवाई केली जाईल ,नागरिकांनी आणि रिक्षा चालकांनी आज असून मीटरने रिक्षा प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात २००६ साली २००८ साली व २०१० साली असेच ३ वेळी मीटर सक्ती करण्यात आली होती, परंतु विरळ वस्ती एमआयडीसी परिसर यामुळे आम्ही त्यास विरोध केला. रिक्षा बंद पुकारला त्यावेळी हिंसक वळण लागले होते, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. शहराचे नागरीकरण वाढले आहे लवकरच मेट्रो शहरात धावणार आहे.
यामुळे विरोधास विरोध न करता रिक्षाचालकांनी काळासोबत बदलले पाहिजे, त्यामुळे आम्ही परवानगी दिली, पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंद्यांवर कृष्ण प्रकाश यांच्या वतीने कार्यवाही चालू आहे एवढी मोठी कार्यवाही यापूर्वी कधीच झाली नव्हती.
यामुळे पोलीस प्रशासन बद्धल आणि कायद्या बद्दल आदर निर्माण झाला आहे, पोलिसांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे तर शहरात कायद्याप्रमाणे मीटर ने रिक्षा सुरू करून पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत.
आयर्न मॅन कृष्ण प्रकाश यांचा सत्कार
या वेळी वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्या बद्धल आयर्न मॅन कृष्ण प्रकाश यांचा महात्मा फुले यांची पगडी घालून बाबा कांबळे यांच्या हस्ते सन्मानित, करण्यात आले.