प्रतिसाद नसल्याने आरबीआयने घेतला निर्णय
नवी दिल्ली : येत्या मार्च पासून 100, 10 आणि 5 रुपयांच्या चलनातील नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बाजारातून काढून घेणार आहे. जिल्हा स्तरावरील बँकांनी आयोजित केलेल्या एका बैठकीत आरबीआयचे सहाय्यक व्यवस्थापक बी महेश यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
10 रुपयांचे कॉईन्स बाजारात आणून 15 वर्षांचा कालावधी लोटला तरी देखील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी कॉईन्संना स्वीकारलेले नाही. अजूनही अनेकांच्या मनात 10 रुपयांच्या कॉईन्सबद्दल शंका आहे. त्यामुळे नवीन कॉईन्स रिझर्व्ह बँकेसाठी अडचणीचे ठरले असल्याचे बी महेश म्हणाले. लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी बँकेकडून काही प्रयत्न केले जावेत, तसेच लोकांनी 10 रुपयांच्या कॉईन्सचा वापर करावा यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले पाहिजे, असंही ते म्हणाले.
2019 मध्ये रिझर्व्ह बँकने 'राणी की वाव' दाखवणाऱ्या नव्या डिझाईनमधील 100 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. असे असले तरी जुन्या नोटा चलनात तशाच सुरु राहणार आहेत. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये मोदी सरकारकडून नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटाही चलनात आणल्या आहेत. मात्र, सध्या चलनात असलेल्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोट मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार आरबीयाचा असल्याचं महेश यांनी सांगितलं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जास्त किंमत असलेल्या नोंटाची छपाई तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे सध्या बाजारात 2000 रुपयांच्या नोटा जास्त दिसत नसल्याचं त्यांनी सांगितलं. नोटाबंदी केल्यानंतर बाजारात कमी वेळात लोकांना जास्त पैसे मिळावेत यासाठी सुरुवातीला 2 हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापण्यात आल्या होत्या.