श्रीरामपूर : तालुक्यातील खानापूर गावात नागेश्वर मंदिरा समोरील गोदावरी नदी पात्रात २४ सप्टेंबर रोजी सापडलेल्या पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख अद्याप पटत नसल्याची माहिती श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात मृतदेह आढळल्या (मिसिंग) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदापात्रात सापडलेल्या या मृतदेहाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षाचे असून उंची ५ फूट ६ इंच आहे. अंगावर लाल रंगाचा फुल बाहीचा शर्ट व करड्या रंगाची हाप पॅन्ट (बरमुडा) आहे. तसेच उजव्या हातावर इंग्रजीत SHER असे गोंदलेले आहे.
सदर मृतदेहाची ओळख पटल्यास अथवा या बाबत कुठलीही माहिती समजल्यास त्वरित श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नवनाथ बर्डे यांच्याशी ९५५२५७४१५८ या मोबाईलवर किंवा ०२४२२-२२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नाशिक मधून गोदापत्रातून वाहत्या पाण्याबरोबर हा मृतदेह वाहून आला असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक मधील गोदावरी नदीपात्राच्या बाजूच्या पोलिस ठाण्यांमध्ये कोणी हरवल्याची तक्रार दाखल असल्यास त्यातील कोणाचा या मृतदेहाशी साधर्म्य असल्यास श्रीरामपूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदूर शिंगोटे (नाशिक) येथून हरवलेल्या माय-लेकीचा मृतदेह गोदापात्रात आढळून आला होता. नंतर या मृतदेहाची ओळख पटली होती.