सावधान..! तुमचे पॅन कार्ड होणार निष्क्रिय

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत अखेरची मुदत

'पॅन'ला 'आधार' लिंक करण्यासाठीची प्रोसेस जाणून घ्या

नाशिक : आधार कार्ड आणि पॅन कार्ड सरकारी कामांसाठी अतिशय महत्वाचे आहे. मात्र हे पॅन कार्ड आधार कार्ड ला 31 मार्च 2021 च्या आत लिंक न केल्यास ते निष्क्रिय होणार असल्याची अधिसूचना मंत्रालयाने काढली आहे.

बहुसंख्य सरकारी कामांसाठी पॅन कार्ड व आधार कार्ड अनिवार्य असल्याने त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. तथापि ते आपणा सर्वांसाठीच महत्वाचे दस्तावेज आहेत. सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे त्यांचे महत्व आणखी वाढले आहे. पॅन कार्डला आधारकार्ड लिंक करणे सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी येत्या 31 मार्च 2021 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तशी अधिसूचनाच मंत्रालयाने काढली आहे. त्यामुळे या वेळेत आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे बंधनकारक झाले आहे. 

या शिवाय येत्या 31 मार्च पर्यंत तुम्ही पॅन कार्ड आधार ला लिंक न करता वापरल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे.  आयकर विभागाच्या मते 'इन्कम टॅक्स कायदा सेक्शन 272 बी' अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. 

पॅनकार्ड निष्क्रिय होऊ नये आणि दंड होऊ नये म्हणून 'पॅन' तुमच्या 'आधार'ला लिंक करणे क्रमप्राप्त आहे. आता हे करण्यासाठी कसे करायचे, कुठल्या ऑफिसमध्ये जायचे, किती खर्च लागेल असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. मात्र, चिंता करू नका आपण घर बसल्या हे काम आपल्या मोबाईलद्वारे चुटकीसरशी करू शकता. त्यासाठी आम्ही आपणास ही सर्व ऑनलाईन प्रोसेस कशी करायची याची सर्व माहिती आमच्या वाचकांसाठी स्टेपवाईज अगदी सोप्या पद्धतीने देत आहोत. 

पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक करण्यासाठी हे करा... 

1) सर्व प्रथम खालील लिंकवर क्लिक करून इन्कम टॅक्स ची वेबसाइट ओपन करा. 

 https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng

2) यानंतर खालील फोटो प्रमाणे आपले पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर व कॅपचा कोड व्यवस्थित भरा. तसेच I agree to validate my Aadhaar details with UIDAI पुढील चौकोनात क्लिक (√) करा. 

3) त्यानंतर लिंक आधार या पर्यायावर क्लिक करून तुमची आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल. 

आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाले की नाही, हे कसे पहाल ?

1) त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून इन्कम टॅक्स ची वेबसाईट ओपन करा. 

https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html

2) त्यानंतर खालील फोटोत दाखविलेल्या प्रमाणे मोकळ्या चौकटीत पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर टाका. 

3) त्यानंतर 'view link Aadhaar status'वर क्लिक करा.


4) यानंतर तुम्हाला खालील मेसेज दिसेल.

अशा रीतीने अगदी सोप्या स्टेप्स द्वारे पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

- ऍड. उमेश सुरेशराव अनपट, नाशिक
(लेखक वरिष्ठ पत्रकार, संपादक 
व कायद्याचे अभ्यासक आहेत)

- वरील माहिती आपणास उपयोगी वाटली असेल तर इतरांनाही शेअर करा. त्यांनाही या माहितीचा लाभ होईल.

-पुढील लेखात कायदेविषयक विविध क्षेत्राशी निगडित माहिती जाणून घेण्यासाठी 'MBP live 24' शी जोडून रहा.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !