मराठा आरक्षणासाठी ठिय्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलन

साष्ट पिंपळगाव येथील राज्यव्यापी आंदोलनात सहभाग 

अंबड : साष्ट पिंपळगाव येथे मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. त्याप्रसंगी गुरुवार पासून सुरू असलेल्या या आंदोलनात विविध संघटनांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर  छावा क्रांतिवीर सेनेने सुध्दा पाठिंबा देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवला. 

त्यावेळी संस्थापक अध्यक्ष करण गायकर  बोलत असतांना म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांनी तारीख पे तारीख हा चित्रपट जास्तच आवडीचा आहे की काय असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर टोला लावला. महाविकास आघाडी सरकार फक्त टोलवा टोलवीचे उत्तर देत आहे एकीकडे मराठा आरक्षण कोर्टात असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली सारथी संस्थेमधील उपक्रम पूर्णपणे बंद केली आहेत ,  सारथी तारादुत प्रकल्प बंद केला आहे.  

अण्णासाहेब पाटील महामंडळ यामध्ये जाचक अटी लागू केल्या. त्यामुळे या सरकारने सरकारच्या हातातील सर्व मागण्या तात्काळ मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा.  मराठा  आरक्षणासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी दोघांमध्ये समन्वय साधून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनाचा अदर्श घेत राज्यात तीव्र  आंदोलन बघायला मिळतील. 

भारतीय जनता पार्टीचे नेतेसुद्धा फक्त टीका करण्यामध्ये व्यस्त आहे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांनी ते मुख्यमंत्री असताना हे आरक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्याच्या पद्धतीने म्हणतात कि हे सरकार गोंधळलेल्या सरकार आहे जर सरकार गोंधळलेलं आहे तर देवेंद्र फडणीस यांनी स्वतः याच्यामध्ये समोर येऊन सरकारला योग्य दिशा दाखवावी. 

कारण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षांची आहे मराठा समाजाचा आता नंतर कोणी बघू नये अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पक्षाला न परवडणारे अस आंदोलन मराठा समाजाकडून करण्यात येईल, याची वेळीच दखल सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी. 

आंदोलनात क्रांतिवीर सेनेचे प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे,  विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक उमेश शिंदे, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, पाटील मराठवाडा कार्याध्यक्ष महादेव कदम, बीड जिल्हाध्यक्ष राहुल चाळक, उद्योजक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष रोशन टर्ले, आयटी सेल प्रदेश कार्याध्यक्ष  वैभव दळवी, बीड जिल्हा सरचिटणीस मुकेश मोटे, येवला तालुका अध्यक्ष  आदित्य नाईक , कृष्णा काळे, भाऊराव धरम राकेश वाघे गणेश सांगळे  अविनाश राऊत  महेश राऊत  दत्ता नरवडे व आकाश उफाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !