ग्रामपंचायतीत शिवसेनेची मुसंडी; आता लक्ष शेवगाव नगरपरिषद

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये नावालाही शिवसेनेचा एकही सदस्य नसताना या निवडणुकीत मात्र शिवसेनेने ग्राम पालिकेत आपले खाते उघडत ग्रामीण भागातही मुसंडी मारली आहे. या विजयाने शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा उत्साह द्विगुणित झाला असून याही पेक्षा जास्त जागा निवडून आणून सेनेचा भगवा झेंडा शेवगाव नगरपरिषदेवर फडकविण्याचा प्रणच केला आहे.


ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यामधे तालुक्यातील ग्रामीण भागातील शिंगोरी, हसनापुर, वाडगाव, ढोरजळगाव, ताजणापुर,तळणी, दहीगाव शे, नजीक बाभुळगाव, लखमापुरी, राक्षी, भावीनिमगाव , नागलवाडी, वरखेड , गदेवाडी, सोन विहीर, हातगाव, कांबी, चापडगाव अशा अनेक गावामधे शिवसेनेने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडुन आणुन चांगली कामगिरी केली आहे. 


शेवगाव तालुक्यात या पुर्वी शिवसेनेचा एकही ग्रामपंचायत सदस्य निवडुन आलेला नव्हता. निवडणुकीत शिवसेनेने वरील गावात आपला ठसा उमटविला आहे. हे उमेदवार निवडुन आणुन पुढील राजकारणाची चुणुक शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाने दाखवून दिली आहे. 


यस ग्रामपंचायत निवडणुक विजयाचा शेवगाव शहराच्या नगरपरिषदेच्या होणा-या निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल. ग्रामीण भागातील निवडुन आणलेल्या सदस्यांचे व कार्यकर्त्यांचे जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी घाडी, विधान सभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे, जिल्हा प्रमुख दक्षिण विभाग राजेंद्र दळवी,  तालुका प्रमुख ॲड. अविनाश मगरे, शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, शीतल पुरनाळे, महेश पुरनाळे , सुनील जगताप, उदय गांगुर्डे, गणेश पोटभरे, मधुकर कराड, सोमनाथ पाटेकर, तनवीर पठाण, महेश मिसाळ, अरुण काटे, अशोक गवते, कानिफ कर्डिले यांनी अभिनंदन केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !