घनकचऱ्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक, नगरपरिषदेला घालणार घेराव

प्रभाग क्रमांक १६ सह शेवगाव बनले कचरामय

नाशिक : घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्षाला दिड कोटी रुपये शेवगाव (जि. अहमदनगर) नगरपरिषद मोजत असतानाही कचऱ्याचे व्यवस्थापनच होत नसल्याने शेवगावकरांचा कराचा पैसा वाया जात आहे. संबंधित श्रुष्टी इंटरप्रायजेस या ठेकेदार कंपनीकडून मुख्य अधिकारी यानी घनकचऱ्याचे व्यवस्थापनाचा प्रश्न ता. २३ जानेवारी पर्यंत मार्गी न लावल्यास  नगरपरिषद कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांनी दिला आहे. 

शेवगावची कचऱ्याचे शहर ही ग्रामपंचायत असतानाची ओळख नगरपरिषद होऊनही पुसायला तयार नाही. नगरपरिषद अस्तित्वात आल्यानंतर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सुमारे दिड कोटी रुपये मोबदला ठरवून देऊन सृष्टी एटरप्रायजेस कंपनीला नगरपरिषदेने ठेका दिला. तेव्हापासून गावाचा कचऱ्याचा प्रश्न मिटेल अशी अपेक्षा शेवंगावकरांना होती. मात्र तसे न झाल्याने सर्वांचाच भ्रमनिरास झाला.

सृष्टी इंटरप्राईजेस नावाच्या या कंपनीकडून कुठल्याही प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन आज होताना दिसत नाही. या कंपनीकडून प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्रासपणे उघड्यावर कचरा टाकला जात आहे. शहरातील इतर भागाची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाही. असे असतानाही नगरपरिषदेकडून संबंधित ठेकेदारावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. परिणामी शेवगावकरांचा कररुपी पैसा नाहक वाया जात आहे. 

शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवार दि. २३ जानेवारी पर्यंत सदर घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लावावा, ही विनंती. अन्यथा शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस च्या वतीने नगरपरिषद कार्यालयाला घेराव घालण्यात येईल.

घनकचरा व्यवस्थापनाअभावी शेवंगावकरांचा पैसा 'कचऱ्यात' : डॉ. अमोल फडके

नगरपरिषद होऊनही शेवगाव शहर आजही बकाल अवस्थेतच आहे. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेच्या कराच्या पैशातून दिड कोटी रुपयांचे कंत्राट सृष्टी एटरप्रायजेस या कंपनीला दिले आहे. मात्र कचरा व्यवस्थापन होत नसल्याने हा पैसा वाया जात असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही नगरपरिषदेला घेराव घालणार असल्याची माहिती शेवगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांनी 'एमबीपी लाईव्ह24' शी बोलताना दिली.

 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !