सावधान ! गृह मंत्रालयाने बँक यूजर्संना दिलाय 'हा' अलर्ट

सायबर गुन्हेगारी चा वाढता धोका

मेसेजमध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकला क्लिक न करण्याच्या दिल्यात सूचना

नवी दिल्ली : देशात ऑनलाईन बँकिंग बरोबरच सायबर गुन्हेगारांतील हॅकर्सचा वाढलेला धोका लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने एक अलर्ट जारी केला आहे.  लोकांनी मेसेजमध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नये, असे गृह मंत्रालयाने सूचित केले आहे. 


कोरोना काळात भारतीय युजर्संना ऑनलाइन बँकिंगची बऱ्यापैकी सवय झाल्याचे दिसत आहे. या बरोबरच बँकिंग फ्रॉडच्या घटनेत सुद्धा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

स्मार्टफोन आल्याने बँकिंगच्या कामांसाठी थेट बँकेत जाण्याची गरज नसून घरी बसल्या बसल्या फोनवरून अनेक गोष्टी करता येऊ शकतात. ही बाब फायदेशीर असली तरी हॅकर्स अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून अनेकदा आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने  ही सुविधा बँक ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

डिजिटल युग सुविधाजन्य असले तरी त्याचा त्याचा धोका देखील दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र देशात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी लोकांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारी करण्यासाठी गुन्हेगारी वेगवेगळे फंडे वापरत आहेत.  

अलीकडे बँकिंग गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे लोकांना जागृत करण्यासाठी सायबर गुन्हेगारांसंदर्भात माहिती देण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. परंतु, अद्याप गुन्हेगारी बंद झालेली नाही. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबत आहेत. यातील एक नवीन ब्रँड पद्धत म्हणजेच सायबर गुन्हेगार लोकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयाने एक नवीन माहिती शेयर केली आहे.

'सायबर दोस्त'ची सूचना

'सायबर दोस्त' नावाचे सरकारचे एक ट्विटर हँडल आहे. याद्वारे लोकांना सूचित करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक नवीन सूचना केली आहे. कोणीही कोणतीही चूक करू नये. तसेच मेसेजमध्ये येणाऱ्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नये, असे गृह मंत्रालयाने सूचित केले आहे. 

या अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर हॅकर्स तुमची सर्व माहिती चोरू शकतात. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी हजारदा विचार करावा, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. सायबर दोस्त ने एक ट्विट केले असून त्यात ही माहिती दिली आहे. जर तुम्हाला कोणताही मेसेज मिळाला तर त्यावर लगेच क्लिक करू नका. 

सावज शोधण्यासाठी हॅकर्स बँक युजर्संना अनेक पद्धतीचे मेसेज पाठवत असतात. यात युजर्संना वॉर्निंग देऊन भटकावण्यचा प्रयत्न करीत असतात. या मेसेजेसमध्ये लिंक दिलेली असते. यावर चुकूनही क्लिक केले तर तुमची माहिती हॅकर्स पर्यंत पोहोचत असते. 

त्यामुळे लक्षात ठेवावे की, कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज कुणी पाठवला, कशासाठी पाठवला, त्याचा उद्देश काय आहे, याची सर्व पडताळणी केल्यानंतर ती लिंक ओपन करावी, अशी सूचना गृह मंत्रालयाने आपल्या ट्विटद्वारे केली आहे. तसेच बँकिंग ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !