खळबळजनक ! 'त्या' मायलेकींचा मृतदेह आढळला गोदापात्रात

 नाशिक : नांदूरशिंगोटे बसस्थानकावरून ४ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या मायलेकींचा मृतदेहच गोदापात्रात आढळून आला. या माय लेकी बेपत्ता झाल्याची तक्रार वावी पोलिस ठाण्यात  केली होती.


मात्र, आता याच मायलेकींचा मृतदेह गोदापात्रात आढळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ४ जानेवारी रोजी ज्योती राठी (वय २५) व त्यांची मुलगी जिया राठी (वय ३) या मायलेकी नांदूरशिंगोटे बसस्थानकावरून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या परिवाराने वावी पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, ७ जानेवारी रोजी ज्योती यांचा मृतदेह रामवाडी पुलाजवळ गोदापात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला. हा मृतदेह फुगून वर आला होता. परंतु, त्यावेळी महिलेची ओळख पटली नव्हती. त्यानंतर, काही दिवसांनी म्हणजेच १४ जानेवारी रोजी जिया राठी हिचा मृतदेह गांधी तलावात आढळून आला. गोदापात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे हा मृतदेह गांधी तलावात वाहत गेला असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता या दोघींची ओळख पटली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !