आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार सज्ज
सोसावा लागू शकतो लाखोंचा फटका
नाशिक : कोरोना वॅक्सिंनचे लसीकरण देशभरात सुरू झाले असून लवकरात लवकर हे वैक्सीन आपल्याला मिळणार असल्याच्या बातम्यांमुळे कोरोनाच्या त्रासाने वैतागलेल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. प्रत्येकाला कोरोना वैक्सीन घेण्याची ओढ लागली आहे. मात्र याचाच गैरफायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार किंवा हॅकर सज्ज झाले आहेत. परिणामी नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
कोरोना वैक्सीन च्या नावाखाली सायबर गुन्हेगार तसेच हॅकर यांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवा फंडा अवलंबला आहे. सायबर गुन्हेगार व हॅकर हे नागरिकांना फोन कॉल करून विचारतात की तुम्हाला कोरोना वैक्सीन पाहिजे आहे का? आपण त्यांना अनुमती दिली असता ते आपल्याला रजिस्ट्रेशनच्या नावाखाली आधार कार्ड ची माहिती विचारतात.
संबधित माहिती आपण सायबर गुन्हेगार तसेच हॅकर यांना सांगितली असता आपल्या मोबाईल क्रमांकावर ६ डिजिट किंवा ४ डिजिट चा OTP आलेला असतो. सायबर गुन्हेगार किंवा हॅकर सदर OTP आपल्याला विचारतात. संबधित OTP आपण सायबर गुन्हेगार किंवा हॅकर यांना सांगितला असता आपले कोरोना वैक्सीन रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल, असे कळविण्यात येते.
तसेच त्यानंतरच आपल्याला कोरोना वैक्सीन मिळेल, असे सांगितले जाते. आपण ज्यावेळेस OTP सायबर गुन्हेगार तसेच हॅकर यांना सांगतो त्याच वेळेस काही सेकंदाने सायबर गुन्हेगार आपले बँक अकाउंट रिकामे करून टाकतात. त्यामुळे आपल्याला आर्थिक फटका सोसावा लागतो.
सायबर गुन्हेगारां पासून
आपला बचाव करण्यासाठी हे करा...
👉🏻 आधार कार्ड बाबत माहिती विचारली असता ती सांगू नये.
👉🏻 रजिस्ट्रेशन च्या नावाखाली आपल्याला आपली स्वतःची वैयक्तिक किंवा खाजगी माहिती विचारली असता ती कोणासही शेअर करू नये.
👉🏻 आपल्या मोबाईल वर आलेला OTP कुणाशी शेअर करू नये.
महत्वाची सूचना...
अशा प्रकारचे सायबर गुन्हे आपल्या सोबत घडले असल्यास आपण आपल्या नजीकचे पोलीस ठाणे किंवा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी. अशाप्रकारचे गुन्हे घडत असल्याने आपण योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.