'बर्ड फ्ल्यू नियंत्रणात; भिती नको‌, काळजी घ्या'

पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची माहिती

मुंबई : राज्यात बर्ड फ्लु नियंत्रणात असून भिती नको‌, काळजी घ्या, या विषाणूचा प्रसार कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी किंवा मासे यांच्यामार्फत होत नाही. मांस, अंडी व मासे बिनधास्त खा आणि आणि तंदुरुस्त राहा! कुक्कुट पक्ष्यांचे मांस, अंडी व मासे यांचे सेवन थांबविल्यास प्रथिनांची कमतरता जाणवू शकते, अशी माहिती पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.


केदार म्हणाले,समाजमाध्यमे व इतर प्रसिद्धी माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या अफवा व आकारण भीती पसरविणाऱ्या बातम्यांपासून सावध राहा.

हे करा

-पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा.

-पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जट पावडरने स्वच्छ धुवा.

-शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.

-एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा.परिसर स्वच्छ ठेवा.

-कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा.

-पूर्ण शिजवलेले मांस खा.

-आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे.

हे करू नका

-कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.

-अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.

-आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.

-पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.

तर टोल फ्री फिरवा

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्या मध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी नागरीकांना केले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !